श्रीराम विद्यालयाला मुक्त विद्यालय मंडळाची मंजूरी - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2019

श्रीराम विद्यालयाला मुक्त विद्यालय मंडळाची मंजूरी



   कोवाड / प्रतिनिधी    मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण व क्रीडा विभागाने मुक्त विद्यालय ही संकल्पना आणली आहे. शाळेत न जाताही कला- क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे, दिव्यांग व काम करणाऱ्या विद्यार्थीना शिक्षण घेता येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना केली असून चालू शैक्षणिक वर्षात त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर झालेल्या 17 संपर्क केंद्रामध्ये श्री राम विद्यालयाचा समावेश आहे. येथील विद्यालयाला  पाचवी, आठवी व दहावी या वर्गांना नुकतीच परवानगी मिळाली आहे. इयत्ता पाचवी ( वय वर्ष 10 पूर्ण ) , व इयत्ता आठवीचे ( वय वर्ष 13 पूर्ण ) प्रवेशही सुरू झाले आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख 31 जानेवारी 2019 असून मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन मुदतवाढ देखील दिली जाणार आहे.शाळाबाहय मुलांच्यादृष्टीने, कामकरी, दिव्यांग व कला- क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणारे , ज्यांनी शाळा सोडली आहे, जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेले आहेत, जे नोकरी करणारे आहेत व ज्यांना शाळांनी प्रवेश नाकारला आहे अशांसाठी 'मुक्त शाळा ' हे वरदान ठरणार आमुक्त शाळेतून मिळालेल्या स्वयंअध्ययन साहित्याचा घरीच अभ्यास करून मुक्त विद्यालय मंडळाची परीक्षा देऊन वंचिताना आपले पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येणार आहे , त्यासाठी वेळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन संपर्क केंद्रप्रमुख तथा प्राचार्य श्री ए.एस. पाटील यांनी केले आहे. 

             
              
             
        

No comments:

Post a Comment