चंदगड तालुक्यात व्ही व्ही पी टी मशीनचे 137 गावात प्रात्यक्षिक - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2019

चंदगड तालुक्यात व्ही व्ही पी टी मशीनचे 137 गावात प्रात्यक्षिक

                         
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तहसिलदार कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील १३७ गावामध्ये व्हीव्हीपीएटी मशिनचे प्रात्यक्षिक तहसिलदार शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनपर संपन्न झाले.                
निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान ईव्हीएम मशिन सेाबत आता येत्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीमध्ये व्हीव्हीपीएटी या मशिनचा वापर केला जाणार आहे. या मशिनच्या माध्यमातून मतदाराला स्वत:चे मतदान कोणाला केले आहे हे त्या व्यक्तीला व्हीव्हीपीएटी मशिनव्दारे काहीवेळ स्क्रिनवर दिसणार आहे. याची माहीती मतदाराला प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यासाठी चंदगड तहसिलदार कार्यालयाकडून २१ डिसेंबर २०१८ ते २२ जानेवारी २०१९ अखेर कार्यक्रम राबवण्यात आला. तालुक्यातील १३७ गावातील १४१ ठिकाणी जसे गर्दीचे ठिकाण, बाजार, महाविद्यालय ईत्यादी ठिकाणी मोहीमेद्वारे जनजागृती करण्यात आली. ९४२१  मतदारांनी या मतदान प्रात्यक्षिकद्वारे व्हीव्हीपीएटी मशिनची माहीती समजुन घेतली. तालुक्यातील कोदाळी या गावात नायब तहसिलदार दत्तात्रय नांगरे यांच्या उपस्थितीत  कार्यक्रमाची सांगता झाली.




No comments:

Post a Comment