कानडेवाडी येथे घटप्रभा नदिपात्रात जल आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2019

कानडेवाडी येथे घटप्रभा नदिपात्रात जल आंदोलन






 तेऊरवाडी ( प्रतिनिधी)
कानडेवाडी ( ता . गडहिंग्लज) येथील बंधाऱ्याजवळ घटप्रभा निदपात्रात पाण्यात उभे राहून पुरुष हक्क सरंक्षण समिती कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब कोकितकर यानी विविध मागण्यासाठी जल आंदोलन केल्यामूळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली .

                कष्टकरी ज्येष्ठ नागरिकांना  ,बारा बलूतेदार,कष्टकरी, शेतमजूर, कारागीर, सुतार, लोहार, बोगार, कुंभार, चर्मकार, व्हलार, दोर्या वळणारे, काचपत्रा गोळा करणारे मोलमजुर,६० वर्षावरील कष्टकरी ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पाच हजार रु पेन्शन मिळावी व रस्ता अपघातात म्रुत्यूमुखी पडल्यास ज्येष्ठ नागरीकांस तात्काळ पाच लाख रु मदत मिळावी या मागण्यांसाठी  पुरुष हक्क संरक्षण समिती कोल्हापूरचे अध्यक्ष आप्पासाहेब कोकीतीकर  यानी जल आंदोलन केले .सरकारने याकडे दुर्लक्ष केले . असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले ,  सहकारातील भ्रष्टाचार अँन्टिकरप्शनच्या कक्षेत आणावा,तसेच लँड माफिया माजी अपात्र मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर  पाटील व वसंतराव चौगुले सह.पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील,मँनेजर,वसुली अधिकारी  आणि साहायक निबंधक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता सी बी आय मार्फत जप्त करावी या सर्व बाबींचा शासन दरबारी विचार करून तात्काळ अमलबजावणी व्हावी  यासाठी आंदोलन करत असल्याचे सांगितले . यावेळी  दत्ता वाइंगडे, बाळू पाटील , नारायण खराडे , रामू पाटील , दयानंद कोकितकर, नामदेव वाईगडे , मारूती वाईगडे , पांडुरंग चंदगडकर , लक्षण पाटील , भरमू नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते . याप्रसंगी नेसरी पोलीस ठाणेमार्फत शिवाजी पाटील, अरूण पाटील, आनंदराव देसाई यानी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .





No comments:

Post a Comment