कोवाड स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2019

कोवाड स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कोवाड : येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिकम स्कूल मध्ये स्नेहसंमेलनातील एक क्षण.

कोवाड / प्रतिनिधी
येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. व्ही.आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. हेमरसचे एच.आर. मॅनेजर जशबीरसिंग रखडा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रविण पाटील यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक श्रीकांत सुळेभावकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यानी देशभक्त,  लोकगीत,  भारुड, नाटयछटा,  कोळीगीतावर कलाविष्कार सादर करुन प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण, विलास पाटील, आनंद क्षिरसागर, मिलींद पाटील, डॉ. अर्चना पाटील, पांडूरंग जाधव,  दयानंद लांडे,  सी. जे. देसाई, अनिल बाचूळकर, विक्रम पाटील, संजय संकपाळ,  उत्तम वांद्रे उपस्थित होते. सीमा कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. रणजित कांबळे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment