हलकर्णी / प्रतिनिधी
२१ जानेवारी रोजी कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) या गावी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखेचा उद्घाटन समारंभ युवक हृदयसम्राट प्रमोददादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना प्रमोद दादा पाटील म्हणाले, "कवठेमहांकाळ तालुका जरी दुष्काळग्रस्त असला तरी तालुक्यातील युवकांना रोजगार देऊन दुष्काळात सुद्धा समृद्धीची हिरवळ फुलवण्याची ताकत छत्रपती ग्रुप मध्ये आहे. दुष्काळा दरम्यान इथल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात येणारे अश्रू पुसण्याच काम छत्रपती ग्रुप करेल व इस्राईल सारख्या देशाची शेती पद्धत कवठेमहांकाळ तालुक्यात राबवून तालुका सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी तन मन धनाने योगदान देऊ." कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रोहित भाऊ मलमे यांनी ग्रुपची ध्येय धोरणे स्पष्ट केली. संपर्क प्रमुख किरण भाऊ गोते यांनी मनोगत व्यक्त केली. त्यावेळी कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष सुशील पाटील, तालुका उपअध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव प्रकाश शिंदे, विभाग प्रमुख तुकाराम सुतार, कुची गावचे मानसिंग कदम, प्रवीण पाटील व सर्व मावळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment