प्रतिक पाटील |
तिरवडे (ता. भुदरगड) येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटामध्ये नागरदळे (ता. चंदगड) येथील प्रतिक पाटील रोझरी इंग्लिश स्कूल आजरा येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्याने प्रथक क्रमांक पटकावला. `छत्रपती शिवाजी महाराजआज असते तर` या विषयावर त्याने उत्तम सादरीकरण केले. आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे आयोजित मृत्यूजयकार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. प्लॅस्टीक बंदी काळाची गरज या विषयावर सादरीकरण केले. आजरा नगरपंचायत येथे झालेल्या भाषण स्पर्धेमध्ये द्वीतीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाला रोझरी इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य फादर फिलीप्स लोबो, निशांत चाँद, अवेलिन फर्नांडीस, विजय केसरकर, श्री. स्टीपन, परशराम पाटील व सौ. संध्या पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
No comments:
Post a Comment