चंदगड / प्रतिनिधी
चंदगड आझाद नगर येथील आदर्श व इंडियन मंडळाच्या वतीने 26 जानेवारी 2019 रोजी दुपारी दोन वाजता खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. आझादनगर येथील आझाद मैदानात स्पर्धा होतील. स्पर्धेसाठी 1000 रुपये प्रवेश शुल्क असून विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 25000 रु., द्वीतीय क्रमांकासाठी 15000 रु, तृतीत क्रमांकासाठी 10000 रु व चतुर्थ क्रमांकासाठी 5000 रुपये यासह प्रत्येक क्रमांकासाठी चषक देण्यात येणार आहेत. याचबरोबर बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर व शिस्तबध्द संघासाठी चषक ठेवण्यात आली आहेत. चंदगड तालुका बाहेरील संघाना राहण्याची व जेवणाची सोय मंडळाच्या वतीने केली आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी कलिम मदार यांच्याशी 8308599556 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment