चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

21 January 2019

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबीर संपन्न

कोकरे (ता. चंदगड) येथे विशेष श्रमसंस्कार शिबीरावेळी श्रमदान करताना माडखोलकर महाविद्यालयाचे स्वयंसेवक.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयाच्या वतीने कोकरे-आडुरे (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराला ग्रामस्थांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत शिबीर यशस्वी केले. सात दिवस चाललेल्या या शिबीरामध्ये विविध उपक्रमाबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रबोधन केले. शिबीराला सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
कोकरे गावच्या तलावातील गाळ काढताना स्वयंसेवक
प्रारंभी तहसिलदार शिवाजी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मतदान जनजागृती संबंधीचा ग्रामस्थांना प्रात्यक्षिक दाखवले. गटविकास अधिकारी आर. बी. जोशी यांनी लोक सहभाग व पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन केले. तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्या हस्ते श्रमदान शिबीराचा शुभारंभ झाला. आरोग्य अधिकारी सौ. स्नेहल मुसळे-पाटील यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमावेळी महिला सबलीकरण व आरोग्य या विषयावर महिलांशी संवाद साधला. गोकुळचे सहा. व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके व गोकुळचे वरिष्ठ पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखील पशुचिकित्सा शिबीर संपन्न झाले. एम. एम. तुपारे व प्रा. आर. पी. पाटील यांनी `व्यक्तीमत्व विकास` व सेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. रवि रेडेकर, ॲड. आर. पी. बांदिवडेकर व ॲड. एस. एल. पाटील यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. ब्लॅक पॅँथरचे अध्यक्ष सुभाष देसाई आधुनिक भारतापुढील समस्या या विषयावर आपले परखड मत मांडले. यावेळी पत्रकार संपत पाटील यांनी युवकांनी पत्रकारीतेच्या क्षेत्राकडे वळण्याची सल्ला दिला. 

सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ पोलिस निरिक्षक एस. एम. यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी माजी रोहयो मंत्री भरमू पाटील प्रमुख पाहुणे, अध्यक्ष प्रा. आर. पी. पाटील व पत्रकार नारायण गडकरी यांनी शिबीरार्थींनी उत्तम श्रमदान केल्याबद्दल व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल कामाची पाहणी करुन अभिनंदन केले. या शिबीरामध्ये ग्राम स्वच्छता, गटर सफाई, सार्वजनिक रस्ता दुरुस्ती, तलाव दुरुस्ती, समाज प्रबोधन चर्चा, महिला आरोग्य व शिक्षण, सर्वेक्षण, पशु चिकित्सा शिबीर, अंधश्रद्धा निर्मूलन यासह अन्य उपक्रम राबविण्यात आले. 
कोकरे येथे हळदीकुंकू कार्यक्रमावेळी महिलांनी केलेली गर्दी. 
शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील मार्गदर्शनाखाली एनएसएस विभाग प्रमुख प्रा. एस. एन. पाटील, प्रा. व्ही. के. गावडे, डॉ. सौ. ए. पी. पाटील, डॉ. एन. के. पाटील, प्रा. ए. डी. कांबळे, प्रा. एस. डी. गावडे, प्रा. डॉ. एन. एस. मासाळ, पी. पी. धुरी, अरुण कांबळे, प्रा. दिपक कांबळे, नारायण किरमटे यांच्यासह विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यींनींनी परिश्रम घेतले. 


No comments:

Post a Comment