तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गटर बांधकामाचा शुभारंभ करताना सरपंच सुगंधा कुंभार उपसरपंच शालन पाटील व ग्रामपंचायत सदस्य. |
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीमार्फत नेसरी - कोवाड रस्त्याकडील नामदेव सुतार यांच्या घरापासून ते लक्ष्मण पाटील यांच्या घरापर्यंत 14 व्या वित्त आयोगातून गटर बांधकाम शुभारंभ सरपंच सुंगधा कुंभार व उपसरपंच सौ. शालन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ल पाटील, बजरंग पाटील, राजेंद्र भिंगुडे, पुंडलिक लोहार, सदस्या सौ.संगीता दिपक पाटील, सौ. सुंगधा एकनाथ पाटील, ग्रामसेविका सौ. सुनिता कुंभार, शिवाजी भिंगुडे, नामदेव सुतार, मनोहर भिंगुर्डे यांच्यासह ग्रांमस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment