![]() |
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वतीविद्यालयाचे चित्रकला ग्रेड परिक्षेतील यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शुभाष बेळगावकर. |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षातील सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सरस्वती विद्यालय कालकुंद्री (ता. चंदगड) च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. एकूण 55 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. एलिमेंट्री ग्रेड परिक्षेचा निकाल 100 टक्के लागला.
या परिक्षेला 30 विद्यार्थी बसले होते. त्यामधे 7 विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाली.यामध्ये वैष्णवी हुंदरे, प्राची जोशी, अस्मिता पाटील, पूर्वा पाटील, सतेज पाटील, वृषाली पाटील, सायली तेऊरवाडकर आदि विद्यार्थ्यांनी यश मिळवले. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल 98 टक्के लागला. एकूण 27 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना A ग्रेड मिळाली. यामध्ये कु. हर्षद पाटील व कु. स्वाती पाटील यांना A ग्रेड व तनूजा कोकीतकर, प्राची माडूळकर, समृद्धी पाटील सर्व विद्यार्थ्यांना B ग्रेड मिळाली. 40 विद्यार्थ्यांना C ग्रेड मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सुभाष बेळगांवकर, शिवाजी पाटील, बी. ए. तुपारे, ए. ए. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. संकुलाचे माजी मुख्याध्यापक एन. आर. पाटील, प्र. मुख्याध्यापक सी. बी. निर्मळकर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment