![]() |
तुडये येथील संभाजीराजे युवक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या सामन्यज्ञान स्पर्धेतील विजयी स्पर्धक सोबत प्राचार्य आय. के. स्वामी, कमलेश जाधव आदि मान्यवर. |
तुडये (ता. चंदगड) संभाजीराजे चुवक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या आंतरराज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत प्राथमिक गटात माणगावच्या सुजैन फडके तर माध्यमिक गटात नागनवाडीच्या पियुष पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला. तुडये येथे बेळगावसह कोल्हापूर जिल्ह्यातील 550 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. प्राथमिक गटातील अन्य विजयी स्पर्धक अनुक्रमे पुढीलप्रमाणे- सुजैन फडके, साक्षी पाटील, शर्विल घोळसे, विघ्नेश कुट्रे, समर्थ चांदेकर, सलोनी बिर्जे, स्वाती पाटील. माध्यमिक गट विजयी स्पर्धक -पियुष पाटील, किरण पाटील, अल्फाज शेख, प्राची मयेकर, धनंजय पाटोल, विघ्नेश हुलजी, सुरज मिलगे. उत्तेजनार्थ हर्षल मयेकर. विजेत्या स्पर्धकांना प्राचार्य आय. के. स्वामी, कमलेश जाधव, प्रा. ए. टी. पाटील आदि मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सदस्यानी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment