शिनोळी (ता. चंदगड) येथे आयोजित कामगारांच्या बैठकीत बोलताना संघाचे चेअरमन राजेश पाटील, शेजारी उपस्थित मान्यवर. |
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
"दौलत चालवायला घेतेवेळी मला राजकारण आणायचे नाही. मला आमदारकीचे स्वप्ने पडायलेत म्हणुन दौलत सुरू करण्याचा मी स्टंन्ट करत आहे असा अपप्रचार होत आहे. हे सर्व चुकीचे आहे. माझे वडील माजी आम. कै. नरसिंगराव पाटील यांचे स्वप्न होते की दौलत साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहीला पाहीजे. त्याचे हे स्वप्न व शेतकरी सभासद व कामगारांचा विचार करुन चंदगड तालुका संघामार्फत दौलत सुरु करणार त्याला कामगारांनी साथ द्यावी" असे आवाहन तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे संघाच्या कार्यालयात आयोजित कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा बँकेने दौलत चालविण्यास देण्यासाठी निवीदा प्रसिध्द केल्या होत्या. चंदगड तालुका संघ दौलत चालविण्यास घेण्यासाठी इच्छुक आहे. त्या पार्श्वभुमीवर कामगाराच्यां बरोबर आयोजीत केलेल्या चर्चेत ते बोलत होते. प्रारंभी प्रास्ताविक जानबा चौगुले यांनी केले. राजेश पाटील पुढे म्हणाले, " स्वतःचे भागभाडंवल नसताना देखील बऱ्याच कपंन्या आल्या आणि शेतकरी सभासद व कामगांराना आगीच्या खाईत लोटुन गेल्या. त्यासाठी दौलतशी संबंधित सर्व प्रमुख घटकाशी चर्चा करणार आहे. कारखान्याच्या उभारणीत सर्व कामगारांनी साथ द्यावी असे भावाणिक आवाहन त्यांनी केले.`` यावेळी तालुका सघांचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील, दौलत कामगार संघटनेचे प्रदिप पवार अर्जुन कुभांर, सुरेश भातकाडें, जे. जी. पाटील, राजेंद्र पाऊसकर, बाबुराव नेसरकर, नारायण तेजम, प्रकाश पाटील आदि कामगारांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी तानाजी गडकरी, विठोबा गावडे, अभय देसाई, राजु पाटील, अली मुल्ला संघाचे संचालक उपस्थित होते. आभार पोमानी पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment