![]() |
मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल निवृत्ती हारकारे यांचा सत्कार करताना माजी ग्रामंपाचयत सदस्य रमेश यादव व इतर सदस्य. |
मजरे कार्वे / प्रतिनिधी
मजरे कारवे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवाजी तुपारे यांची तर उपसरपंचपदी निवृत्ती हरकारे यांची निवड करण्यात आली. 26 सप्टेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी शिवाजी तुपारे हे थेट जनतेतून निवडून आले होते. प्रशासनामार्फत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज निवृत्ती हारकारे यांचा आल्याने त्यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी तुपारे होते. ग्रामसेवक दीपक कांबळे यांनी प्रास्ताविक करून या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला व उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याचे घोषित केले.
चंदगड तालुक्यात सह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मात्र निवडणुकीत सत्ताधारी गटाने विरोधकांचा धुव्वा उडवून या निवडणुकीत विजय संपादन केला होता. एकूण सरपंच यांचे सह आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आठच्या आठ जागा जिंकून या गटाने या निवडणुकीची इतिहासात नोंद केली होती.
![]() |
सरपंच शिवाजी तुपारे उपसरपंच निवृत्ती हारकारे |
यावेळी सरपंच शिवाजी तुपारे म्हणाले, ``कारवे गावानं जो आमच्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासास पात्र राहुल येत्या पाच वर्षात गावात विकासकामांचा डोंगर उभा करू.`` नवनिर्वाचित उपसरपंच निवृत्ती हरकारे म्हणाले, ``कारवे गावातील ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पाच वर्षात विकास कामे केली जातील. सर्वांना सोबत घेऊन गावचा विकास करण्याकडे आमचा कल राहील. सर्वांचे सहकार्य असेच राहिल्यास येत्या पाच वर्षात गावचा चेहरामोहरा बदलून टाकू.`` यावेळी बोलताना तानाजी गडकरी म्हणाले, या निवडणुकीची नोंद इतिहासात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे या गावाकडे लक्ष आहे. विकासात कुठेही कमी न पडता गावचा विकास इतका करुया की येत्या पाच वर्षानंतर गावची निवडणूक बिनविरोध होऊन त्याची संधी पुन्हा याच कमिटीला मिळावी. यावेळी माजी सदस्य रमेश यादव, अशोक हरकारे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीस माजी उपसभापती देवाप्पा बोकडे, माजी सरपंच सौ निशा बोकडे, माजी सदस्य नारायण तेजम सुबराव हरकारे, अशोक बोकडे, सोमनाथ हरकारे, जयवंत हरकारे आदींसह नवनिर्वाचित सदस्य पांडुरंग बेनके, दिलीप परीट, स्मिता बेनके, बेबीताई बोकडे, प्रियांका हरकारे, अंजली सुतार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment