दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
"माझ्या मंत्री पदाच्या काळात अलबादेवी गावासाठी पाणी, रस्ते यासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली होती. पण मधल्या काळात पद नसल्यामुळे गावाकडे दुर्लक्ष झाले. याला आपणही काही प्रमाणात जबाबदार असून "झालं गेलं गंगेला मिळाले " सचिन बल्लाळ आणि सभापती बबनराव देसाई यांच्या माध्यमातून अलबादेवी गावचा राहिलेला अनुशेष टप्प्या-टप्याने भरून काढणार " असे असे प्रतिपादन माजी मंत्री भरमुअण्णा पाटील यांनी केले. अलबादेवी (ता. चंदगड) येथील चौद्याव्या वित्त आयोगासह इतर विकास कामांच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. सभापती बबनराव देसाई अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ म्हणाले, "मागील वेळी गावाने विकासाच्या मुद्यावर आगामी लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. भविष्यात लोकशाही मार्गानेच विकास निधी खेचून आणूया. येथून पुढे अलबादेवी गावचा विकास ही माझी व सभापती बबनराव देसाई यांची जबाबदारी असून तालुक्याच्या विकासाठी आम्ही कटीबद्ध आहोत." प्रास्ताविकात श्रीकांत नेवगे यांनी पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत इमारत, जिल्हा परिषद मराठी शाळा, या तीन वर्षात गावांतर्गत रस्ते व गटारी यासाठी किमान 8.50 लाख निधी असा पाऊनकोठीचा निधी अण्णांनी अलबादेवी गावासाठी दिल्याचे सांगितले. उपसरपंच राजाराम पाडले यांनी येथून पुढे आण्णा, सचिन बल्लाळ,सभापती देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच रेखा देवळी, संग्राम अडकूरकर, धोंडिबा घोळसे, कृष्णा रेगडे, अडकुरचे उपसरपंच अनिल कांबळे, रघुनाथ कोले, यशवंत घोळसे, नामदेव डांगे, विठोबा मोरे, सुनीता पाटील, सुनीता पाडले, विकास डांगे, परशराम चौकुळकर, बंडू घोळसे, गणू चौकुळकर, पांडुरंग नार्वेकर, धनाजी नेवगे, सुधाकर डांगे, नामदेव नेवगे, बबन कोले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आभार ग्रामसेविका अश्विनी कुंभार यांनी मानले.
No comments:
Post a Comment