विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्राकडे वळावे - डॉ. एस डी मोरे - चंदगड लाईव्ह न्युज

20 January 2019

विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्राकडे वळावे - डॉ. एस डी मोरे


कालकुंद्री (प्रतिनिधी)
आजचे युग विज्ञान-तंत्रज्ञान स्पर्धेचे असल्याने प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्राकडे वळून सीए सीएस याकडे उत्तम करिअर म्हणून पहावे .यासाठी पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा महत्त्वाच्या वृत्तपत्रातील अग्रलेख वाचावेत. शेअर मार्केटचा उत्तम अभ्यास करून कौशल्य आत्मसात केल्यास या क्षेत्रातील भवितव्य उज्वल आहे. विवेकानंद कॉलेज कोल्हापूर चे प्रा. एस. डी. मोरे यांनी केले. कोवाड (ता. चंदगड) येथील महाविद्यालयात आर. जी. पाटील करियर डेव्हलपमेंट सेंटर मार्फत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर जांभळे होते. स्वागत प्राचार्य आर. एस. निळपणकर यांनी केले. यावेळी विवेकानंद कॉलेज कोल्हापुर मधील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वाती कदम, सोनाली कोळी, शीतल कांजर  या विद्यार्थिनींनी  आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संचालक बी. के. पाटील, एम. जे. पाटील, बी. आर. पाटील, गुंडू सावंत, नरसिंग बाचुळकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मोहन घोळसे यांनी केले. आभार संचालक प्रा. पी. सी. पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment