दयानंद काणेकर |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन व पंचायत समिती सदस्य दयानंद सुधाकर कानेकर यांचा आज वाढदिवस. या निमित्त अनेक मान्यवर मंडळींनी त्यांना चंदगड येथे प्रत्यक्ष भेटून, फोनवरुन, सोशल मिडीयावरुन दिवसभर शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर आज दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. चंदगड शहरामध्ये ठिकठिकाणी चौका-चौकात डीजीटल फलक उभारुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तोट्यात असलेल्या चंदगड अर्बन बँकेला दयानंद काणेकर चेअरमन झाल्यापासून आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर बँकेला नफ्यात आणून गतवैभव प्राप्त करुन दिले. या चंदगड अर्बन बँकेमध्ये त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून शुभेच्छा देताना शिवसेनेचे विधानसभा संघटक संग्रामदादा कुपेकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, संचालक अरुण पिळणकर, संचालक संजय ढेरे, मुरलीधर बल्लाळ, सचिन सातवणेकर, अजय कदम, प्रमोद कांबळे, डॉ. अनिल पाटील, मनोज गडकरी, भारत गावडे यांच्यासह प्रमुख उपस्थित होते.
No comments:
Post a Comment