माणगांव अपघातातील ट्रक चालकावर गुन्हा दाखल करा - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2019

माणगांव अपघातातील ट्रक चालकावर गुन्हा दाखल करा




कोवाड/ प्रतिनिधी
शुक्रवारी  दुपारी माणगांव बंधाऱ्याजवळ झालेल्या अपघातातील ट्रक चालकावर गुन्हा दाखल करावा , अशी मागणी लोकांच्यातून होत आहे . ट्रकच्या मागून येणाऱ्या प्रवाशानी ट्रकचा थरार मोबाईल मध्ये कैद केल्याने ट्रक अपघाताचे वास्ताव समोर आले आहे . सोशल मेडीयावर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत असल्याने अपघाताची जोरदार चर्चा सुरु आहे . निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केलेल्या ट्रक चालकालाचं जखमी अवस्थेत ट्रक मधून बाहेर काढून प्रवाशांनी जीवदान दिले . पाटणे फाटा येथून हेमरस साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक चालकाच्या बेजबाबदार वागण्यामुळे माणगांव बंधाऱ्यालगत रस्त्याकडेला पलटी झाला . सुदैवाने ट्रकच्या समोरुन येणारी कारगाडी बाजूला आल्यानंतर टूक कोसळला . अन्यथा मोठा अनर्थ घडला असता . ट्रकच्या मागून येणा - या प्रवाशांनी सुसाट वेगाने निघालेल्या ट्रकचा थरार मोबाईलमध्ये कैद केल्याने अपघाताचे वास्तव समोर आले आहे . सोशल मेडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या अपघाताची जोरदार चर्चा सुरु झाली आहे . या अपघाताची पोलीसांत नोंद झाली नाही . परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रवाशांच्यात धडकी निर्माण करणाऱ्या या अपघाताची पोलीस दखल घेणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

No comments:

Post a Comment