चंदगड / प्रतिनिधी
सुरुते (ता. चंदगड) येथील सुरुते विद्यालयात विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या कामगार सेना व युवासेना यांच्या मार्फत शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी शैक्षणिक जीवनात हातभार लागावा व उत्तम विद्यार्थी तालुक्यात उदयास यावेत. या हेतुने हा कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना नेहमी समाजकारणात पुढे असते. बाळासाहेब ठाकरे यांचे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकरण या मुलमंत्राच्या उद्देशाने आज सर्व पदाधिकारी काम करत आहेत. या वेळी कामगार सेना तालुका प्रमुख कल्लापा निवगिरे, युवासेना तालुका प्रमुख प्रताप उर्फ पिणु पाटील, श्री सुतार, श्री. चौगुले, श्री. पवार, अवधूत पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment