दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
" पुणे -मुंबई येथील नाटक ग्रामिण भागात पोहचले पाहीजे. नाटक हे कुणाच्या एकटयाची मिराजदारी नसते. नाटयपढंरीची पताका घेऊण मिरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी नाटकाच लोण ग्रामिण भागात पोहचले पाहीजे. त्यासाठी चळवळीची गरज आहे. पण सर्वांच्या अगोदर चंदगड तालुक्यातील युवंकाणी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे". असे प्रतिपादन नाटयकलावंत व प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी केले. ते भाषाविकास सशोंधन संस्था हलकर्णी, ता. चंदगड आयोजीत चंदगडी नाटय महोत्सव २०१९ च्या उद्घघाटण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिक्यंतारा उद्योग समुहाचे अविनाश पाटील होते. यावेळी माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, भाजप कार्यकारणी सदस्य गोपाळराव पाटील, गोकुळचे सचांलक राजेश पाटील, अभिनेते अभिजीत झुजांरराव उपास्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक मध्ये ग्रामीण भागातील कलाकाराला वाव मिळाला पाहीजे. येथुन पुढे हा नाटय महोत्सव दरवर्षी भरवला जाईल. त्यासाठी नाटयरसिक प्रेमींची साथ मिळणे गरजेचे असल्याचे नाटय महोत्सवाचे सचिव परसु गावडे यांनी सागितले. सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पुजन करुण दिपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष अविनाश पाटील याच्या हस्ते सर्व मान्यवरांणा रोपटे व स्मृतीचिन्ह देऊण स्वागत करण्यात आले. राजेश पाटील याच्या हस्ते श्रीफळ वाढऊण नाटय महोत्सवाचे उद्घघाटण करण्यात आले.
यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले, ' नाटयमहोत्सव घडवण्यासाठी तालुक्यातील तरुणांची धडपड खरच कौतुकास्पद आहे. कलाकाराला कलेची आवड असेल तर त्यात तो स्वतःला झोकुण देतो. अशा कार्याच्या पाठीशी सतत आपण राहु' असे म्हणाले.
यावेळी तालुक्यातील नाटयप्रेमी मोठया सख्येंने उपस्थित होते. अभिजीत झुजारराव दिग्ददर्शीत ' गस्त ' हे नाटक यावेळी सादर करण्यात आले.आभार कमिटी सदस्य धनाजी पाटील यानी मानले
No comments:
Post a Comment