किटवाड शाळेचा शुभम पाटील थाळीफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2019

किटवाड शाळेचा शुभम पाटील थाळीफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम

शुभम पाटील
चंदगड / प्रतिनिधी
किटवाड (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी शुभम ओमाना पाटील याने कोल्हापूर येथे झालेल्या वैयक्तिक थाळीफेक क्रीडाप्रकारात वरिष्ठ गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याला मुख्याध्यापक विजय अष्टेकर, सागर पाटील, व्ही. आह. मुगुरकर, देवानंद पाटील, डी. एल. वांद्रे,  के. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. शुभम याच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी एस. एस. शुभेदार,  सभापती बबनराव देसाई यांनी अभिनंदन केले.



No comments:

Post a Comment