चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रिडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना तहसिलदार शिवाजी शिंदे व व्यासपीठावर इतर मान्यवर.
|
मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्त्व आहे. खेळामुळे माणसाच्या प्रतिभा शक्तीचा विकास होतो. न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढीस लागतो. अपयश पचविण्याची सामर्थ्य प्राप्त होते. खेळात हार व जीत महत्त्वाची नसून आपण कसे खेळलो हे महत्वाचे असते. अपयशाने खचून व यशाने हुरळून जाऊ नये हि शिकवण खेळातूनच प्राप्त होते. खेळ ही मानवी जीवनाची प्रतिकृती असून त्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब दिसते असे प्रतिपादन तहसिलदार शिवाजीराव शिंदे यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रिडामहोत्सवाच्या उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी मानवी जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगून सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न करण्याचा मान मिळतो असे सांगितले. यावेळी एम. पी. पाटील, प्रा. एस. के. सावंत, डॉ. पी. एल. भादवणकर, क्रीडा समितीचे सदस्य प्रा. एल. एन. गायकवाड, प्रा. आर. व्ही. आजरेकर यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. क्रिडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. एन. साळुंखे यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment