चंदगड येथे युनायटेड सुतोकान कराटे डु इंडिया कराटे क्लासच्या मुलांना बेल्ट प्रदान करण्यात आले. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे युनायटेड सुतोकान कराटे डु इंडिया (USKI) यांच्या वतीने प्रशिक्षण पूर्ण केलेल्यां कराटे क्लासच्या यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे युवा नेतृत्व तजम्मुल फणीबंद व इतर मान्यवर उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल पाटील व तजम्मुल फणीबंद यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बेल्ट व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यशस्वी विद्यार्थी शिनोळी, तुर्केवाडी, कारवे, जंगमहट्टी व चंदगडच्या क्लासेसचे आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रॅंडमास्टर गुलामरब्बानी शेख (रा. तुर्केवाडी) यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment