![]() |
संग्रहित छायाचित्र |
दौलत हलकर्णी
खासदार धनजंय महाडीक
याच्या वाढदिवसानिमित्त, श्रीरामलिंग कुस्ती संघटना व शिवजंयती उत्सव मंडळ व
ग्रामस्थ तुडीये (ता. चंदगड) यांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे विराट मैदान
मगंळवार १९ फेब्रुरवारी रोजी ३ वा. आयोजीत केले आहे. या कुस्ती मैदानात एक नंबरची
कुस्ती पै. नाथा पालवे, सभांजी पवार
तालीम सागंली व पै. अशोक कुमार दिल्ली, अजबगड आखाडा, हरियाना केसरी तर दोन नबंरची कुस्ती पै. आसिफ मुलानी, सभांजी पवार
तालीम सागंली व अमितकुमार, चॉदरुप आखाडा दिल्ली यांच्यात होणार आहे. जवळपास चाळीस
ते पन्नास इतर लहान मोठ्या कुस्त्या या मैदानात होणार आहेत. यावेळी आखाड्याचे
उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार
धनजंय महाडीक, आमदार संध्यादेवी कुपेकर, आम. लक्ष्मीबाई हेब्बाळकर, आजी माजी जि. प. व प. स. सदस्य उपस्थित
राहणार आहेत. कुस्ती शौकीनांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन तुडये ग्रामस्थांच्या
वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment