कुमरी ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये सहभागी झालेली बेलगाडी सोबत चोपदार व विणेकरी
|
श्री विठ्ठल रखुमाई वारकरी सांप्रदायीक मंडळ मौजे कुमरी (ता. गडहिंग्लज) पूज्य गुरुवर्य महादेव काका दळवी यांच्या कर्मभूमीतून कुमरी ते पंढरपूर पायी दिंडी ०६ ते १७ फेब्रुवारी पर्यंत बैलगाडीसह अखंड भजन प्रवचन कीर्तन करत चालत आहे. या दिंडीला वारकरांच्या मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगाप्रमाणे मुखी हरिनामाचा जयघोष करत खांद्यावर भगवी पताका घेऊन ही वारकरी मंडळी पंढरीकडे जात आहेत. या पायी जात असणाऱ्या दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक सर्व ह.भ.प. तुकाराम सखोबा वाईंगडे महाराज (काकांचे शिष्य) संजय जानबा पाटील, दशरथ परसू वाईंगडे, मारुती शिवाजी आडली, माजी सरपंच जानबा सट्टुपा नांदवडेकर, रवळू राणबा पोळकर,जयवंत गणु सुतार, कृष्णा चंद्रू पाटील, सदाशिव बाळू सुतार, गोविंद वि. पोळकर व बैलजोडी मालक भरमा निंगोजी गुरव, महिला ग्रामस्थ मंडळ (कुमरी) चोपदार बाळु कृष्णा पाटील (मोरेवाडी) मृदंगमनी शिवाजी सखाराम लोहार (मलिग्रे) सागर शिवाजी पावले (दाटे) आदि संत जनांचा यामध्ये समावेश आहे.
No comments:
Post a Comment