![]() |
हुंबरवाडी (ता. चंदगड) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करताना राजेश पाटील सरपंच सौ. आश्विनी कांबळे व ग्रामस्थ. |
माणगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातुन हुंबरवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ तालूका संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माणगावचे सरपंच सौ. अश्विनी कांबळे होत्या. यावेळी हुंबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबदद्ल राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अनिल सुरुतकर यानी केले. सर्वांचे स्वागत बसवंत चिगरे यांनी केले. यावेळी राजेश पाटील म्हणाले, ``तालुका संघाला या वर्षी राज्य स्तरावरील दोन पुरस्कार मिळाले आहेत .संघाची वाटचाल आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे.त्यामुळे संघाचे नाव राज्य स्तरावर पोहोचले आहे. याप्रमाणेच दौलत कारखाना चालावायला तयार आहे . पण शेतकरी , कामगार , विविध सहकारी संस्था यांची साथ गरजेची आहे . कारखाना चालवताना गट - तट बाजूला ठेवून सर्वानी एकत्र येवून कारखाना चालवायचा आहे . त्यासाठी जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे पाठविणे गरजेचे आहे आज तालुक्यात दौलत बंद असल्याने इतर कारखाने मनमानी कारभार करत आहेत . हे सर्व थांबवायचे असेल तर एकच पर्याय दौलत चालू करणे होय. मी सर्व संस्थाना , नोकर वर्गाना , शेतकऱ्याना विनंती करतो की आपण सर्वजन संघामध्ये आपली ठेव ठेवावी तुम्हाला व्याजा सहित तुमचे पैसे संघाकडूनपरत केले जातील . आपण आमच्यावर विश्वास ठेवा असे सांगून पूर्वी सारखे वैभव प्राप्त करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज असल्याचे त्यानी आपल्या भाषणात स्पष्ट म्हणाले. यावेळी संरपंच आश्विनी कांबळे यानी मनोगत व्यक्त केले . उपस्थिती मध्ये गजानन कुंभार , जयवंत सुरूतकर , यमाजी गावडे , प्रकाश गावडे , उत्तम सुरूतकर ,गावडू पाटील , गुंडू मेटकुप्पी , संभाजी कुंभार , विकास पाटील , भारती गावडे , कमल होनगेकर , पार्वती चिंचणगी , व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .शेवटी आभार ईश्वर गावडे यानी मानले.
No comments:
Post a Comment