चंदगड तालूका मराठी अध्यापक संघामार्फत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2019

चंदगड तालूका मराठी अध्यापक संघामार्फत हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील मराठी अध्यापक संघामार्फत तालुकास्तरीय हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार १८ फेब्रुवारी 2019 रोजी तालुक्यातील चंदगड, नागनवाडी, अडकूर, कार्वे, माणगाव, पाटणे, शिनोळी, तुडये, कागणी, कालकुंद्री या प्रमुख केंद्रावर सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धा ४ थी ते ७ वी व ८ वी ते १o वी या दोन गटात होणार आहेत. स्पर्धेसाठी दोन्ही गटांसाठी  अनुक्रमे ५०१, ४०१, ३०१, २०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून १० रुपये प्रवेश फी आहे. स्पर्धकांनी येताना मराठी विषयाचे पुस्तक सोबत आणावे. विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रावर आपले नाव नोंदवावे असे आवाहन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव शिवणगेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment