खिलाडुवृत्ती जोपासून व यशाचा पाठलाग करा - कमलेश जाधव - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2019

खिलाडुवृत्ती जोपासून व यशाचा पाठलाग करा - कमलेश जाधव


दौलत हलकर्णी
"आजकालचे खेळ खेळताना व्यक्तिगत हेवेदावे बाजुला ठेवून सांघिकरीत्या खेळ खेळायला हवा.खेळात हारजीत असतेच .जिंकल्याचा उन्माद बाळगू नये आणि हारल्यामुळे खचुन जाऊ नये .तसेच सफल खेळाडू उत्तम ज्ञानी असायलाच हवा म्हणूनच खेळ व अभ्यास दोन्ही गोष्टीना महत्त्व व पुरेसा वेळ द्यायला हवा .व आपल्या खेळात प्राविण्य ,नैपुण्य व सफलता मिळवण्यासाठी ,स्पर्धामध्ये कामगिरी व्यवस्थित होण्यासाठी खिलाडूवृत्ती जोपासा व यशाकडे धाव घ्या " असे प्रतिपादन  कमलेश जाधव यांनी केले. महागांव ( ता. गडहींग्लज) येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.एस. घोलप होते.
औंरगाबाद ,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी पुणे व सैन्यदल व पोलिसदल तसेच युपीएससी ते तलाठी अभ्यास कशाप्रकारे करावा कोण कोणती पुस्तके वाचावी यांची यादी कांलकुद्री गावचे विजयश्री फौंडेशन चे प्रा .जाँर्ज क्रुझ सरानी लिहलेले पोस्ट काढायची गोष्ट या पुस्तकाबद्द्ल  व शासणाचे मुखपत्र लोकराज्य याबददल कमलेश जाधव यांनी माहीती दिली. यावेळी अनिल सरंबळे (महाराष्ट्र पोलीस), बबन कुपेकर (पोलिस पाटील, मासेवाडी), सुरज आसवले (युवा सेना चिटणीस गडहिंग्लज), एस. एस. सरंबळे (क्रीडा शिक्षक),  व्हि. आर. पाटील (क्रीडा शिक्षक) सदाशिव पताडे (बापु), पी. बी. असावले (पर्यवेक्षक ) व एम. बी. पाटील (सांस्कृतिक विभाग प्रमुख)  उपस्थित मान्यवर होते. या वेळी सुत्रसंचालन एम. बी. पाटील तर आभार पी. बी. अस्वले यांनी मानले.

No comments:

Post a Comment