किल्ले पारगड येथे वनविभागामार्फत गॅसचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2019

किल्ले पारगड येथे वनविभागामार्फत गॅसचे वाटप

किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे वनविभागाच्या वतीने एलपीजी गॅसचे वितरण झाले. यावेळी उपस्थित विनविभागाचे कर्मचारी व लाभार्थी ग्रामस्थ. 
चंदगड / प्रतिनिधी
डॉ. शामप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत मौ. पारगड नामखोल व मिरवेल येथील लाफार्थ्यांना एल. पी. जी. गॅस वाटप संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने 75 टक्के अनुदानावर करण्यात आले. यावेळी चंदगड प्र. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील, वनपाल श्री. निकम, वनरक्षक एच. एस. काळवेल, श्री. शिंदे, वनसेवक पावणु गावडे, अध्यक्ष प्रकाश चिरमुरे, रघुवीर शेलार, माजी सरपंच विद्याधर बाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment