![]() |
चंदगड-हेरे मार्गावर पुराचे पाणी आले आहे. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंदगड तालुक्यात दहा दिवसात पुन्हा पूरस्थिती निर्माण झालेली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत पिळणी, तारेवाडी, हिंडगाव, बिजुर भोगली, कानडी सावर्डे, अडकूर, कानडेवाडी हे बंधारे तर चंदगड व हिंडगाव पुलदेखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्याच्या अनेक मार्गावरील एसटी वाहतूक देखील बंद झाले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्याने आगाराचे नुकसान होत आहे. चंदगड-हेरे मार्गावरील चंदगड पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील एस. टी. वाहतुक बंद झाली आहे. मात्र काही धाडसी प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून खाजगी वाहने या पुराच्या पाण्यातून घालत प्रवाश करत आहेत.
संततधार मुसळधार पावसामुळे मात्र रोप लावणीच्या कामाला गती आले आहे. तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात रोप लावणी केली जाते. त्यासाठी मोठ्या व मुसळधार पावसाची आवश्यकता असते. सद्या मुसळधार पाऊश सुरु असल्याने लोक लावणीच्या कामासाठी शिवारे फुलली आहेत. संततदार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. हवेत कमालीचा गारवा निर्माण झाल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तालुक्यातील घटप्रभा, जंगमहट्टी व जांबरे प्रकल्प १०० टक्के भरल्याने पावसाचा जोर असाच राहिल्यास पुर वाढण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment