कराटे स्पर्धेत चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2019

कराटे स्पर्धेत चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे यश

विशाखापट्टणम आंध्रप्रदेश येथे झालेल्या इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत यश मिळविलेले चंदगड तालुक्यातील खेळाडू.
चंदगड / प्रतिनिधी 
राजीव गांधी इनडोअरम स्टेडियम (पोर्ट) विशाखापट्टणम आंद्रप्रदेश येथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत चंदगड तालुक्यातील मुला-मुलींनी भाग घेतला व यश मिळवले. या स्पर्धेत देश-विदेशातून कराटेपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये चंदगड तालुक्यातील मुलांनी संपादन केले. 
सिल्वर पदक स्पर्धेत तीन सिल्वर पदकांची कमाई केली. यामध्ये जयवर्धन राजेंद्र बोकडे (कारवे स्कूल), ज्ञानेश्वर धामणेकर ( जंगमहट्टी), गणेश झंगरुचे (सोनेली, बेळगाव). ब्राँझ पदक विजेते करुणा पाटील (कुद्रेमानी), तनूस अबोलकर (बसर्गे), दिवेश प्रकाश निट्टूरकर (लाकुरवाडी), ऋषिकेश मिरासे (पाटणे फाटा), साद अप्पाज शेख (बेळगाव), सुदेश नावीद अत्तार (सेंट स्टीफन्स इंग्लिश मिडीयम चंदगड), ज्ञानेश्‍वर गावडे (जंगमहट्टी), भक्ती पाटील (बेळगाव) या मुलांनी ब्रांच पदकाची कमाई केली. ही स्पर्धा युनायटेड कराटेचे चीप प्रेसिडेंट चंद्राबाबू नायडू, चेअरमन सुमन ऑर्गनायझर पी जी व्ही आर नायडू, यु. एस. के चे प्रेसिडेंट हैदरअली, सेक्रेटरी ताजुद्दीन बाबू, डायरेक्टर गुलाब शेख उपस्थित होते. हि स्पर्धा भरत शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या मुलांना प्रशिक्षक शिहान मास्टर गुलाम शेख यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले. 


No comments:

Post a Comment