चंदगड / प्रतिनिधी
सुंडी (ता. चंदगड) येथील वाळकेवर ग्रुप मार्फत सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी खुल्या कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला 22222 व 15222 अशी रोख बक्षिसे, तसेच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, मॅन ऑफ दी मॅच, मॅन ऑफ दी लीग, शांतताप्रिय संघ अशी बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. यावेळी प्रमूख पाहणा म्हणून स्टार कब्बडीपट्टु सुरज देसाई उपस्थित राहणार आहेत. इच्छूक संघानी स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रुपच्या वतीने केले आहे.
No comments:
Post a Comment