विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्यासाठी ज्ञानाला कौशल्याची जोड द्यावी - डॉ. अविनाश शिरसाट - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2019

विद्यार्थ्यांनी उज्वल भवितव्यासाठी ज्ञानाला कौशल्याची जोड द्यावी - डॉ. अविनाश शिरसाट

चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात अकौटन्सी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना डॉ. अविनाश शिरसाट, शेजारी प्रा. एस. के. सावंत आदी. 
चंदगड / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी ज्ञानाला कौशल्याची जोड, सोबत वक्तृत्व कलागुण अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पुणे येथील निलया शैक्षणिक संस्थेचे डॉ. अविनाश शिरसाट यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या अकौटन्सी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते.
अकौटन्सी विभाग प्रमुख प्रा. एस. के. सावंत यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. डॉ. शिरसाट म्हणाले`` विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष व्यवहारात करणे महत्वाचे आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता असणारा यंत्रमानव निर्माण होत आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी सक्षम विद्यार्थी निर्माण व्हावेत. विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी भाषा प्रभुत्व, वकृत्व, नेतृत्वगुण, हजरजबाबीपणा, वक्तशीरपणा असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीचा विचार करता अनेक विद्यार्थी ताणतणावामध्ये वावरताना दिसत आहेत. त्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी खेळ, व्यायाम, योगा या बाबीकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे असे सांगितले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ``जीवनासाठी विद्यार्थी दशेतच कष्ट घेणे गरजेचे आहे. आजच्या युगात इनामी माणसापेक्षा बुध्दीवंत माणसाची गरज असून बुध्दीमत्तेला कौशल्याची व कलेची जोड दिल्यास जीवनामध्ये अडचणीवर मात करता येते. यावेळी सुरज पवार यांचेही भाषण झाले. यावेळी डॉ. पी. एल. भादवणकर, डॉ. ए. वाय. जाधव, जोतिबा तेजम, प्रल्हाद कांबळे, ज्ञानेश्वर सुतार यांच्यासह विद्यार्थ्यी उपस्थित होते. प्रा. ए. डी. कांबळे यांनी आभार मानले. डॉ. टी. ए. कांबळे यांनी आभार मानले. 

No comments:

Post a Comment