चंदगड / प्रतिनिधी
अल्पावधीत किणी-कर्यात भागासह संपूर्ण चंदगड तालुक्यामध्ये नावारूपास आलेल्या कोवाड (ता. चंदगड) येथील रूपपसंगम स्वस्तम साडी डेपोमध्ये लहान मुलासाठी जंगल किडस् या नावीन्यपुर्ण दालनाची सुरवात करणेत आली. या दालनाचे उद्घाटन बँक आँफ महाराष्ट्र शाखा कोवाडचे मँनेंजर ऋशिकेष घोरपडे यांच्या हस्ते झाले. दिपप्रज्वलन कब्बडीस्टार खेळाडू सुरज देसाई यांच्या हस्ते करणेत आले. यावेळी जनता सह बँक शाखा कोवाडचे मँनेंजर मच्छींद्र देसाई, प्रा. ए. टी. पाटिल, रमेश डोंगरे, दयानंद लांडे, नागोजी पाटिल हे उपस्थित होते.
रूपसंगमचे मालक दयानंद सलाम यानी स्वागत केले. ते म्हणाले, ``18 वर्षाच्या कापड व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर रूपसंगमचे विविध कपड्यांचे विभाग सुरू होते. पण लहान मुलांसाठी कपडे दालन नव्हते. ग्राहकांच्या आग्रहास्तव हे ही सुसज्य दालन ग्राहकांच्या सेवेत रूजू होत आहे. खरेदी महोत्सव २०१९ अंतर्गत लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी रूपसंगमने आपल्या ग्राहकांसाठी आणलेली आहे. या स्किममधील बक्षिसे हिरो एच एफ डिलक्स, दहा ग्रँम सोन्याचा नेकलेस, आठ ग्रँम सोन्याची चेन, वाँशिंग मशीन, फ्रीझ, टि व्हि., रेंजर सायकल, मँट्रेस गादी, व्हि. आय. पी. बँग, पैठणी आदी दोनशे पन्नास बक्षिसे आहेत. या स्किमचा कालावधी एक फेब्रुवारी ते ३१ मे २०१९ पर्यंत आहे. लकी ड्राँ ची सोडत १६ जुन २०१९ आहे. रूपसंगम शोरूम मधून दहा हजारच्या खरेदिवर एक कुपन दिले जाईल. खरेदि चार महिन्यात टप्प्या टप्याने केली तरी चालेल, अथवा ग्रूप खरेदी सुद्धा करता येईल. यावेळी सचिन पाटील. बाळासाहेब पाटिल, विनायक पोटेकर, शशिकांत खोराटे, राजू हाल्याळी, दशरथ भिकले यांच्यासह कोवाड व्यापारी व ग्राहक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment