जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य लढ्याला यश - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2019

जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य लढ्याला यश


चंदगड / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 227 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामोशी समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत  300 कोटी पुढील तीन वर्षे साठीचे तरतुद  28 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार आर्थिक मंजुरी दिली. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित संघर्ष यात्रा आज चौथा दिवस व त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील 100 कोटी रुपयांची विशेष तरतूुद आज रोजी पूर्ण केली. या आंदोलनात जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला सहभाग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या प्रयत्नामुळे हे यश आले आहे .यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

No comments:

Post a Comment