तिरमाळ जवळ 16 बकरी ठार, हल्ला कोणत्या प्राण्याकडून, वनखात्याकडून चौकशी सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

20 March 2026

तिरमाळ जवळ 16 बकरी ठार, हल्ला कोणत्या प्राण्याकडून, वनखात्याकडून चौकशी सुरू

 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

     तिरमाळ गावच्या शिवारात गुरुवारी दि. १९ मार्च २०२६ रोजी अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात १६ लहान मोठ्या बकऱ्यांचा मृत्यू झाला. हा बकऱ्यावरील हल्ला कोणत्या प्राण्यांकडून झाला आहे, याबाबत आता वन खाते चौकशी करत आहे. बकरी ठार झाली. पाटणे वन विभागाच्या वनक्षेत्रपाल शितल पाटील, वनपाल जॉन्सन डिसोजा घटनास्थळी भेट देऊन चौकशीला सुरुवात केली आहे. सिद्धाराम यल्लाप्पा धनगर (राजगोळी खुर्द, ता. चंदगड) या धनगराचे या घटनेमुळे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी उसाच्या मळ्यात सदर बकरी जाळी लावून बसवली होती. यात लहान मोठी सोळा बकरी होती.

     सिद्धराम हे कामानिमित्त पाहुण्यांच्या गावी गेले होते. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. हा हल्ला भटक्या कुत्र्यांकडून झाला आहे की लांडगा वा कोल्हा या वन्य प्राण्याकडून झाला आहे, ही आता ट्रॅप कॅमेरा मधून कळेल.

No comments:

Post a Comment