चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथील शिक्षक कॉलनीच्या रस्त्याच्या कामासाठी माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील व जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नाने खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध दिला आहे.
शिक्षक कॉलनीच्या रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील व जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी खासदार महाडिक यांच्या फंडातून पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध दिला आहे. याकामी दिलीप चंदगडकर, रवि शिरगे, आकाश चंदगडकर, ओमकार चंदगडकर आदींनी या कामासाठी भरमुआण्णा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांना ये-जा करणे सोईस्कर होणार आहे. कित्येक वर्षे शिक्षक कॉलनीतील नागरीकांना कच्च्या रस्त्यावरुन ये-जा करावे लागत होते. त्यांना पक्का रस्ता मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment