![]() |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 13 व्या वर्धापन दिनानिमित्त फळे वाटप करण्यात आली. |
हलकर्णी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 13 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका अध्यक्ष राज सुभेदार यांच्या मार्फत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व आरोग्यासाठी पेन व फळे वाटप करण्यात आली.
आज ९ मार्च या दिवशी महाराष्ट्रनवनिर्माण सेनेची स्थापना झाली होती. मनसेने मराठी तरुणांच्यासाठी मराठी अस्मितेसाठी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे समाज कार्य सुध्दा चांगल्या प्रकारे केले आहे. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना विवेक मनगुतकर, गडहिंग्लज तालुका सचिव प्रफुल्ल आठले यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना कोल्हापूर प्रभातदादा साबळे, अमर कांबळे (उपध्यक्ष), अभिजीत कांबळे, राजु बोकडे, संदेश आवडण, नितेश नाईक, रुपेश कुंभार, सहकारी व शाळा कमिटी सदस्य यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment