राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम हेमरस साखर कारखान्याच्या नवव्या गळीत हंगाम सांगता समारंभात बोलताना युनिट हेड भरत कुंडल व सोबत विविध विभागांचे प्रमुख. |
कालकुंद्री / प्रतिनिधी
ओलम हेमरस साखर कारखाना कोणालाही विक्री केला जाणार नाही अशी ग्वाही राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम हेमरस साखर कारखान्याचे युनिट हेड व कंपनी उपाध्यक्ष भरत कुंडल यांनी दिली ते कारखान्याच्या 2018-19 मधील नवव्या गळीत हंगाम सांगता समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
ओलमचे बिझनेस हेड श्री. कुंडल म्हणाले, ``शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे कारखान्याने या गळीत हंगामात 6 लाख 50 हजार 717 करून उच्चांक प्रस्थापित केला. पुढील वर्षीही कामगार व शेतकऱ्यांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर सात लाखांच्यावर विक्रमी गाळप करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.`` येत्या गळीत हंगाम 15 ऑक्टोबर 2019 पासून सुरू करणार असून या गळीत हंगामात उत्कृष्ट कामगार व शेतकऱ्यांना 'ओलम श्री' पुरस्काराने सन्मानित करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षी प्रतिटन 2920 रुपये बिले अदा केली असून कॉलम मार्फत शेतकरी प्रबोधन व ऊस विकासासाठी उपक्रम यापुढेही चालू राहतील असेही त्यांनी सांगितले. कारखान्याचे केन हेड अनिल पाटील यांनी पुढील हंगामात सात लाख टनापेक्षा अधिक गाळप करू. पण कारखाना दुसऱ्याला विकू नका असे भावनिक आवाहन केले. त्यावर कुंडल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी एच. आर. हेड जसबिर सिंह, टेक्निकल हेड देवराज, प्रोसेस हेड शशांक, कॉलिटी हेड चेन वीर, केन हेड सुधीर पाटील, सहाय्यक शेती अधिकारी नामदेव पाटील व अनिल पाटील, सुरक्षा विभाग प्रमुख पी. एम. रेडेकर, कामगार प्रतिनिधी संतोष गुरव सर्व कामगार, शेतकरी व वाहतूक प्रतिनिधी उपस्थित होते. आभार सहाय्यक शेती अधिकारी अनिल पाटील यांनी मानले.
1 comment:
Good sejon 18/19. All the best for next sejon
Post a Comment