पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2019

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार श्री. नांगरे यांना देताना तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, खजिनदार संपत पाटील, संतोष भोसले, चेतन शेरेगार, दिपक कांबळे आदी.
चंदगड / प्रतिनिधी
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर असोशिएशन संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाने कोल्हापूर जिल्हा रिपोर्टर असोसिएशनच्या नुकताच आदमापूरला झालेल्या कार्यशाळेतील ठरावानुसार असोशिएशनच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन चंदगडच्या तहसिलदार यांना देण्यात आले. नायब तहसिलदार दत्तात्रय नांगरे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, जिल्हा रिपोर्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल धुपदाळे, तालुका पत्रकार संघाचे खजिनदार संपत पाटील, सह सेक्रेटरी चेतन शेरेगार, संतोष सावंत-भोसले,  दिपक कांबळे, राजेंद्र शिवणगेकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment