कागल एसटी आगारातील महिलांच्या गौरवा प्रसंगी उपस्थित महिलावर्ग. |
हेरले (कागल) /सलीम खतीब
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन शाखा कागलच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त कागल नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी, कागल एसटी आगाराच्या वाहक महिला कर्मचारी आणि पंचायत समितीच्या महिला अधिकारी यांचा पत्रकार संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.
कागल एसटी आगारामध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले महिला आपलं कुटुंब संसार संभाळून नोकरी करत असतात. यामध्ये त्यांचा मोठा त्याग आहे. अत्यंत सहनशील रहात वाहक महिलांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. या क्षेत्रात आम्ही कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे. महिलांनी याहीपेक्षा विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले. तालुकाध्यक्ष महादेव कानकेकर यांनी महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करतात. हे महिलांनी अनेक क्षेत्रांमध्ये सिद्ध करून दाखवले आहे. म्हणजे आज महिलांना संधी ची गरज आहे ते उंच भरारी घेतील असे त्यांनी सांगितले.
जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे म्हणाले आपण पुरुष दिन कधीच साजरा करत नाही मग महिला दिनच साजरा का करतो. असा प्रश्न उपस्थित करून समाजाने ,कुटुंबाने, महिलांचा रोजच सन्मान केला पाहिजे. कौन्सील मेंबर नंदकुमार कांबळे, चालक कृष्णात कोरे, सरिता भानुसे, स्नेहा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कागल नगर परिषदेच्या आरोग्य विभागात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा पत्रकार संघटनेचे कौन्सील मेंबर भास्कर चंदनशिवे यांनी शहर स्वच्छतेच्या कामांमध्ये आरोग्य विभागातील महिलांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या कामाला त्यांनी सलाम केला. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे म्हणाले माझ्या महिला कर्मचाऱ्यांचे काम देश पातळीवर गेले आहे. पालिकेला आरोग्य विभागाच्या कामामुळे जे पुरस्कार मिळाले त्यामध्ये माझ्या महिला कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. यांनी स्वीकारलेलं काम अतिशय प्रामाणिक केले आहे. या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, रमेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी एसटी बस आगारातील महिला कर्मचाऱ्यांचा, कागल नगरपालिकेच्या आरोग्य महिला कर्मचाऱ्यांचा, तसेच कागल पंचायतीच्या गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, पंचायत समितीच्या सभापती राजश्री माने यांचा पत्रकार संघटनेच्यावतीने गौरव करण्यात आला.यावेळी उपसभापती विजय भोसले, माजी उपसभापती रमेश तोडकर, साताप्पा कांबळे, यांच्या सह पं स.चे कर्मचारी उपस्थित होते. स्वागत आगार व्यवस्थापक प्रकाश शिंदे, प्रास्ताविक भास्कर चंदनशिवे, सूत्रसंचालन व आभार कृष्णात कोरे यांनी मानले. कार्यक्रमास कोर कमिटी मेंबर भाऊसाहेब सकट, कागल शहराध्यक्ष कृष्णात कोरे, कागल तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे, कागल तालुका कार्याध्यक्ष सागर लोहार, मुरगूड शहर खजानीस राजू चव्हाण, सचिन नाईक, फारूक मुल्ला, मनोज हेगडे, कुंदन भिशे, सुभाष पवार, रमेश कांबळे, यांच्यासह महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment