![]() |
चोकाक (ता. हातकणंगले) येथील पुलावरून वॅगनार आर कोसळून अपघात झाल्याने कारचे मोठे नुकसान झाले. (छायाचित्र -सलीम खतीब)
|
कोल्हापूर सांगली राज्य मार्गावर चोकाक (ता. हातकणंगले) येथील पुलावरून खाली कार कोसळून अपघात झाल्याने कारमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले. वॅगनार आर क्रमांक (एम. एच. ५० एल. ०३७९) ही कार कोल्हापूरहून सांगलीकडे जात होती. चोकाकच्या पुलानजीक आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार खाली वीस पंचवीस फूट कोसळली. गाडीत चार ते पाच प्रवाशी होते. अपघात झाल्याचे प्रवाशांना व ग्रामस्थांना समजताच कारमधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून सीपीआरला उपचारासाठी पाठविले. कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघातस्थळी हातकणंगले पोलीसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला. या यटनेची नोंद हातकणंगले पोलीसात झाली आहे.
No comments:
Post a Comment