हेरले / प्रतिनिधी
महिंद्रा आणि ट्रेंडी व्हील्स नागांव ( ता. हातकणंगले) यांच्या संयुक्त विद्यमाने ७५ पाँईट फ्री चेकप मेगा कॅम्पचे आयोजन दिनांक ४ मार्च ते १२ मार्च २०१९ या कालावधीत आयोजित केले आहे यांचा शुभारंभ लेफ्टनन कर्नल पंडितराव याच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रम ची सुरवात पुलवामा येथील भारतीय शहीद जवानाना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
कंपनीचे जी. एम. प्रशांत तोडकर यांनी प्रास्ताविक केले. कंपनीचे सीईओ दीपक जाधव यांनी या कॅम्पमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधांची व योजनांची सविस्तर माहिती दिली. कर्नल पंडितराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्याचा आर्मी दलामधील अनुभव सांगितला व आपल्या दैनदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करावा याची उत्तम उदाहरणे दिली. ट्रेन्डी व्हील्सचे चेअरमन उदय लोखंडे यांनी कॅम्प कालावधीमध्ये कंपनी मार्फत वाहनाच्या दुरुस्ती वरती भरघोस सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले. महिंद्राची नुकतीच लॉंच झालेली एक्स यू ३०० या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व महिंद्रा पार्सनल वाहन धारकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी कंपनीचे सर्विस मॅनेजर सतीश परमाज,राहुल पाटील,मदन डांगे, पूनम जाधव तसेच सर्व कर्मचारी वर्ग व ग्राहक वर्ग उपस्थित होते.
No comments:
Post a Comment