तेऊरवाडी येथे 50 लाख 94 हजार रुपयांच्या पेयजल योजनेचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2019

तेऊरवाडी येथे 50 लाख 94 हजार रुपयांच्या पेयजल योजनेचा शुभारंभ


तेऊरवाडी येथे पेयजल योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना जि.प. सदस्य कल्लाप्पा भोगण , सरपंच श्रीमती कंभार व ग्रामस्थ
 तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता . चंदगड) येथे 50 लाख 94 हजार रुपयांच्या पेयजल पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार होत्या .
वारंवार पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या तेऊरवाडीसाठी निट्टूर तलाव क्रमांक दोन वरून जलस्वराज्य योजना राबविण्यात आली आहे. पण या योजनेचे पाणी अपूरे पडत असल्याने पुन्हा 50 लाख 94 हजार रुपयांची पेयजल योजना मंजूर करण्यात आली. आज या कामाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी उपसरपंच सौ. शालन पाटील, विलास पाटील, श्री. व्हन्याळकर, माजी सरपंच वाय. बी. पाटील, मारूती पाटील, जनार्दन पाटील, ग्रामसेविका सुनिता कुंभार, दत्तात्रय पाटील, प्रकाश दळवी यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य , तंटामुक्त सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते .

No comments:

Post a Comment