चंदगड ग्रामीण रुग्णांलयातील चुकीची वागणुक देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसेच्या वतीने धारेवर धरले. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड ग्रामीण रुग्णांलयात मनसेच्या वतीने ग्रामीण रुग्णांलयामध्ये येणाऱ्या रुग्णांना चुकीच्या पध्दतीेने वागणुक दिली जाते. याबाबचा जाब तालुका अध्यक्ष सत्वशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण रुग्णांलयात कार्यकर्त्यानी अचानक भेट देऊन विचारला. रुग्णांलयातील संबंधित कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने धारेवर धरुन हिसका दाखवत कामात हलगर्जीपणा करण्यात येणार नाही असे लेखी लिहून घेतले.
चंदगड ग्रांमीण रुग्णांलयात उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांना रुग्णांलयातील काही कर्मचाऱ्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने वागणूक मिळत असल्याने कांहींनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मनसे तालुका अध्यक्ष सत्वशिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णांलयात भेट दिली व कामात हलगर्जीपणा करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने जाब विचारला व धारेवर धरले. या दोन्ही कर्मचाऱ्यांना मनसे स्टाईलने समज देऊन या दोघेही कर्मचाऱ्यांना यापुढे कामात हलगर्जीपणा करण्यात येणार नाही असे लेखी घेवुन ते वैद्यकीय अधिकारी डाॅ. साने यांच्याकडे देण्यात आले. यावेळी विवेक मनगुतकर, राज सुभेदार यांच्यासह तालुका उपाध्यक्ष अमर कांबळे, नितेश नाईक, अभिजीत जोशिलकर, दिपक पाटिल यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment