तंबाखूमुक्त शाळा 'उपक्रमाबद्दल के. जे. पाटील यांचा जि.प. च्या वतीने सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2019

तंबाखूमुक्त शाळा 'उपक्रमाबद्दल के. जे. पाटील यांचा जि.प. च्या वतीने सत्कार

कोल्हापूर येथे `तंबाखुमुक्त शाळा` उपक्रमाबद्दल के. जे. पाटील यांचा सत्कार करताना सीईओ अमन मित्तल, बाजूला अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस्. एफ्. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. दिलीप पाटील. 
चंदगड / प्रतिनिधी
किटवाड  (ता. चंदगड) या शाळेतील सहाय्यक शिक्षक के. जे. पाटील यांचा 'राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत'  त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल  कोल्हापूर जि. प. च्या वतीने सीईओ अमन मित्तल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जि. प. कोल्हापूर, सलाम मुंबई फौंडेशन, रोटरी क्लब कोल्हापूर या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा शल्यचिकित्सक, सी. पी. आर. रुग्णांलय कोल्हापूर यांच्यावतीने 'राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांर्गत' के. जे. पाटील यांनी  'तंबाखूमुक्त शाळा' हा उपक्रम उत्कृष्टपणे राबविला. त्या बद्दल त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. 
श्री. पाटील यांनी गेली सहा वर्षे  'तंबाखूमुक्तशाळा' हा उपक्रम कालकुंद्री, कागणी, किटवाड या शाळांमध्ये प्रभावीपणे राबविला असून तालुकापातळीवरील प्रशिक्षणामध्ये 'तंबाखूमुक्त शाळा' या विषयावर  मार्गदर्शन केले आहे. रॅली, माहितीपत्रके, पथनाट्य, रांगोळी, संदेशातून प्रबोधन, वैयक्तिक मार्गदर्शन, विविध स्पर्धा, कथा, कविता, लेखातून प्रबोधन अशा विविध उपक्रमातून तंबाखूविरोधी चळवळ उत्कृष्टपणे राबविली आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस्. एफ्. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. योगेश साळे, डॉ. हर्षला वेदक, डॉ. दिलीप पाटील, प्रशासनाधिकारी केशव यादव, माध्य.शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथ.शिक्षणाधिकारी सौ. आशा उबाळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे  अमित माटे, सलाम मुंबई फौंडेशनचे रवी कांबळे, सौ. जयश्री जाधव, केंद्रप्रमुख वाय. आर. निट्टूरकर आदीसह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. 

2 comments:

Unknown said...

के जे पाटील सरांंचे अभिनंदन.

Unknown said...

अभिनंदन पाटील सर

Post a Comment