कालकुंद्री येथील अखंड नाम सप्ताहाला 11 पासून प्रारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

10 March 2019

कालकुंद्री येथील अखंड नाम सप्ताहाला 11 पासून प्रारंभ


कालकुंद्री  (प्रतिनिधी) 
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर चा वार्षिक अखंड नाम सप्ताह उद्या सोमवार ११ मार्चपासून प्रारंभ होत आहे.
श्री भोले शंकर च्या "सांब सदाशिव सांब हर हर सांब सदाशिव सांब" अशा सात दिवस अखंड जयघोषात साजरा होणारा महाराष्ट्रातील हा एकमेव सप्ताह समजला जातो. सोमवारी   सूर्योदयाबरोबर सप्ताहाला प्रारंभ होत असून आठव्या दिवशी सोमवारी दि.१८ रोजी सूर्योदयाला सांगता व त्याच दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे .सप्ताह काळात रोज सायंकाळी सात ते आठ ब्रह्माकुमारीज् यांचे प्रवचन रात्री नऊ ते बारा ह भ प विठ्ठल फड महाराज बीड यांचे कीर्तन , रात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत भजन दुपारी बारा ते चार पर्यंत महिला भजन असा रोजचा कार्यक्रम आहे. नवसाच्या बालकांची तुलादान कार्यक्रम रविवार दिनांक १७  रोजी दुपारी बारा ते सायंकाळी सात पर्यंत राहणार आहे .
पहिल्या दिवशी ११ रोजी सायंकाळी चार ते सहा वाजता आदिनाथ आणि आकाश पाटील किटवडे ता चंदगड यांचे शास्त्रीय संगीत व कुमारी अश्विनी सूर्यकांत पाटील घुलेवाडी यांचे भावगीत भक्तिगीत गायन कार्यक्रम तर सोमवारी १८ समाप्ती रोजी सोन्याची शिरोली ता. राधानगरी येथील श्रीपाद वल्लभ संगीत भजन प्रस्तुत संस्कृती महाराष्ट्राची हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी जिल्हाधिकारी सुबराव पाटील, विलास पाटील, जुन्नरचे प्रांताधिकारी संजय बाळाराम पाटील हे बंधू तसेच डॉ हरीश पाटील, निवृत्त वनाधिकारी भरत पाटील ,उद्योजक ज्योतिबा अमृत पाटील, रामराव हरिभाऊ पाटील ,अशोक कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित राहणार आहेत सर्व भाविकांनी सप्ताह काळात देव दर्शनाबरोबर विविध कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे .


No comments:

Post a Comment