चंदगड / प्रतिनिधी
तावरेवाडी (ता. चंदगड) येथील श्री मंगाईदेवी मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा गुरुवारी ता. 14 ते शनिवारी 16 मार्च 2019 या कालावाधीत आयोजित केला आहे. गुरुवारी 14 सकाळी पासून मुहूर्तमेढ, शिवचरित्रावर व्याख्यान, दुपारी संगीत भजन, हरिपाठ, सायंकाळी हरिपाठ, पंचपदी, किर्तन व रात्री हरीजागर होईल. शुक्रवारी 15 रोजी सकाळी काकड आरती, मूर्ती अभिषेक व धार्मिक विधी, दुपारी संगीत भजन, हरिपाठ, सायंकाळी प्रवचन दीपोत्सव, पंचपदी, कीर्तन व हरिजागर होईल. शनिवार 16 रोजी पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते अकरा काला कीर्तन, त्यानंतर पालखी मिरवणूक, गंगापूजन, महाआरती, गाऱ्हाना, दुपारी जेष्ठ नागरीक स्नेहमेळावा व सत्कार व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. रात्री शाहिरी कार्यक्रम होईल. या वर्धापनदिन सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment