राजगोळी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2019

राजगोळी खुर्द ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन साजरा

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे महाराष्ट्रदिनी ध्वज फडकवताना. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात विविध कार्यक्रमांनी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच मावळेश्वर कुंभार, उपसरपंच सुनील मोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक विनय संभाजी हे उपस्थित होते. यावेळी राजगोळी येथील  सर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक, मुले, मुली, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment