चंदगड / प्रतिनिधी
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाने दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना एस. टी. पासची सवलत मिळावी. या हेतुने यावर्षी शिवाजी विद्यापीठाने माडखोलकर महाविद्यालयाला अनुदान दिले आहे. या अनुदानासोबत विद्यार्थी सहाय्यता निधीतून स्वतंत्र तरतुद करुन दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यींनींना एस. टी. पास सवलत दिली. महाविद्यालयाने विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविण्यामध्ये नेहमी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे गरीब विद्यार्थ्यींनींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याने परिसरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment