पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा रिपोर्टर असोसिएशनतर्फे म्हाडाच्या अध्यक्षांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2019

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा रिपोर्टर असोसिएशनतर्फे म्हाडाच्या अध्यक्षांना निवेदन

आपल्या विविध मागण्यांचे निवेदन समरजितसिंह घाटगे यांना देताना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य.
कागल / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध मागण्या सह पत्रकारांसाठी गृहनिर्माण सोसायटीची जागा द्यावी ,पत्रकारांच्या मुलांना नोकर्‍या आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये राखीव जागा असाव्यात ,मोफत एसटी पास, टोल फ्री यासह विविध मागण्यांसाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने पुणे म्हाडाचे  अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काळे, कौन्सिल मेंबर भास्कर चंदनशिवे, कोर कमिटी चे सदस्य भाऊसाहेब सकट, कागल तालुका अध्यक्ष महादेव कांकेकर., कार्याध्यक्ष सागर लोहार, तालुका उपाध्यक्ष संजय कांबळे, अविनाश पाटील,
यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकार सामाजिक सेवेच्या भावनेतून अत्यल्प मानधनावर काम करीत असतात. अशा वेळी अनेकांना संकटांना सामोरे जावे लागते. अधिस्वीकृती पत्रकारांची संख्या राज्यांमध्ये अत्यल्प आहे. त्याचे निकषही जाचक आहेत. हे निकष शिथिल करून सर्वांना अधिस्वीकृती  पत्रकार म्हणून मान्यता द्यावी. तसेच पत्रकार भवनासाठी व पत्रकारांच्या हौसिंग सोसायटी साठी म्हाडाची जागा ही उपलब्ध करून द्यावी. हे स्पष्ट करून आपल्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या विविध मागण्या बाबत मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणावी. असे त्यांनी सांगितले.
घाटगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यपातळीवर काम करणाऱ्या मराठी पत्रकार परिषदे शी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामधील पत्रकारांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ, तसेच त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळाव्यात, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांसाठी कायमस्वरूपी निवाऱ्याची सुविधा व्हावी, यासाठी हाउसिंग सोसायटीची जागा उपलब्ध करून द्यावी, पत्रकारांना टोल फ्री पास सुविधा द्यावी, एसटी महामंडळाने ही मोफत पास ची सुविधा द्यावी. आदी मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत..समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकारांच्या मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार  केला जाईल. तसेच पत्रकारांच्या अडी अडचणी, समस्या, विविध मागण्या याबाबत मुख्यमंत्र्यांची निश्चित भेट घडवून आणू अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी प्रकाश नाईक,  दत्तात्रेय वारके, राजेंद्र चव्हाण, रवींद्र शिंदे रमेश पाटील, मनोज हेगडे, फारूक मुल्ला, अशोक ससे, नरेंद्र बोते, तानाजी पाटील, आदींसह कागल तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment